दगडी येथे 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या

यावल : तालुक्यातील दगडी येथील विजय वसंत ठाकरे (32) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. मद्याच्या नशेत ही आत्महत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. विजय हा बुधवारी घरी एकटा असताना त्याने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली तर सायंकाळी ही घटना उघडकीस आली. यावल ग्रामीण रुणालयात डॉ.शुभम तिडके यांनी शवविच्छेदन केले. या प्रकरणी यावल पोलिसात पांडुरंग ठाकरे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत विजय ठाकरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परीवार आहे. पुढील तपास हवालदार गोरख पाटील करीत आहे.

Copy