दंड न भरल्यास संपत्तीवर चढविला जाणार बोजा

0

अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍या 14 जणांवर महसूल प्रशासनाचा बडगा
पाचोरा तालुक्यातील उर्वरितांकडून 17 लाख दंड वसूल येणे बाकी

पाचोरा – पाचोरा तालुक्याचे प्रताधिकारी म्हणून राजेंद्र कचरे पाटील यांनी पदभार स्विकारल्या पासून तहसिलदार बी.ए.कापसे, निवासी नायब तहसिलदार अमित भोईटे, उमाकांत कडनोर, संभाजी पाटील, मंडळाधिकारी, तलाठी यांनी अवैध वाळू वाहतूक करणार्‍यावर कारवाईचा बडगा सुरु ठेवला आहे. 1 एप्रिल ते नोव्हेंबर अखेर 29 वाहनावर कारवाई करुन सुमारे 33 लाख रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. या पैकी 14 वाहन धारकाकडून 15 लाख 2714 रुपये दंड वसूल केला आहे. मात्र अद्यापही गेल्या सहा-सात महिन्यांपासून 15 टॅक्टर तहसिलदार कार्यालयात जमा असुनही त्यांचेकडून 17 लाख 36 हजार 480 रुपये दंड वसूल होणे बाकी आहे. अवैध वाळू वाहतूक करणार्‍या वाहनधारकांनी एक महिन्याचे आत आकारलेला दंड भरुन अपली वाहने सोडवून न घेतल्यास त्यांचे 7/12 उतारा अथवा ग्रामपंचातीचे नमुना नंबर 8 यासारख्या संपत्तीवर बोझे बसविले जाणार आहे.

पाचोरा तालुक्यात रात्री अपरात्री भल्या पहाटे चोरट्या गौण खनिज उत्खनाला आळा घालण्यासाठी एप्रिल 2018 ते नोव्हेंबर 2028 ह्या आठ महीन्याच्या कालावधीत पथकाने 29 वाहने पकडून त्यांचेवर 33 लाख रुपये दंडाची कारवाई केली. यातील 14 वाहन धारकांनी 15 लाख 2 हजार 714 रुपये दंड भरुन अपली वाहने सोडवून घेतले. मात्र वाहने जप्त करून महिण्याचेवर कालावधी होऊनही दंड भरुन अद्याप वाहने सोडवून न नेणार्‍या मनोहरशिंग परदेशी (बांबरुड महादेवाचे), रुपेश परदेशी (पुणगांव), मधू शंकर परदेशी (भट्टगांव), सुभम कैलास पाटील (हडसन), संदिप शंकर पाटील यांचे दोन ट्रॅक्टर (पाचोरा), अरुण गणेश कोळी ( कुरंगी ), पिंटू पाटील (पाचोरा), संजय पडोळ (पाचोरा), शैलेश साहेबराव पाटील (बांबरुड), सोपान कैलास पाटील (अंतुर्ली), योगेश प्रकाश पाटील (माहीजी), पृशोत्तम सदाशिव पाटील (अंतुर्ली), नामदेव पांडुरंग सावळे (गोराडखेडा), संदिप परदेशी या 15 वाहन धारकाकडील दंड वसुल होणे बाकी आहे.

एक महिन्याची दिली मुदत
अवैध खोणखनिज वाहतूक करतांना पथकाने वाहन पकडून जमा केल्यानंतर एक महिण्याचे आत दंड भरुन आपले वाहन न सोडविल्याने वरील 15 वाहन धारकांना तहसिलदार बी.ए. कापसे यांनी तलाठ्यांमार्फत नोटिसा बजावल्या असुन अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतून करणार्‍या वाहनांवर महाराष्ट्र जमिन महसूल संहींता 1966चे कलम 48 मधील सुधारणे नुसार नोटिस मिळाल्यापासून सात दिवसांचे आत दंड न भरल्यास संपत्तीवर बोझा बसवून ट्रक्टरचा लिलाव करुन दंड भरुन घेतला जाणार आहे.

Copy