थोरगव्हाणला दोन गटात हाणामारी : पाच संशयीतांना अटक

यावल : तालुक्यातील थोरगव्हाण येथे रात्रीच्या सुमारास मोटरसायकल रस्त्यात आडवी का उभी केली या कारणांवरून दोन गटात शाब्दिक चकमक व नंतर झालेल्या वादात चार जण जखमी झाले. याबाबत यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा गटांनी तक्रार दिल्यावरून पाच संशयीतांना अटक करण्यात आली.

परस्परविरोधी गुन्हा
रामेश्वर किशोर पाटील (19) यांच्या तक्रारीनुसार, शनिवारी रात्री पावणेआठ वाजता शेतातून येत असतांना दुचाकीजवळ समाधान मंगल सोनवणे, निलेश समाधान सोनवणे, योगेश लहु सोनवणे व सुनील रामकृष्ण सोनवणे (सर्व राहणार थोरगव्हाण) यांनी म्हटले की तुम्ही रस्त्यात का मोटरसायकल उभी केली आहे आमचे वाळुचे ट्रॅक्टर येत आहे. असे बोलुन शिवीगाळ करून यातील समाधान सोनवणे याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने दिनेश अशोक पाटील यांच्या डोक्यावर व छातीवर मारहाण करून दुखापत केली तसेच त्यांच्या सोबत असलेले योगेश सोनवणे व सुनील सोनवणे यांनी सोबत असलेले प्रवीण भागवत पाटील यांना लाकडी काठीने हातावर व पाठीवर मारहाण करून दुखापत केली व वाळुने भरलेले ट्रॅक्टर त्याच ठिकाणी खाली करून त्या ठिकाणाहुन निघुन गेलेत. दुसर्‍या गटातर्फे समाधान मंगल सोनवणे यांनी म्हटले आहे की, शनिवार, 10 जुलै रोजी रात्री 7.45 वाजेच्या सुमारास थोरगव्हाण गाव शिवजवळ दुचाकी (एम.एच.19 डी.डी.7182) ने शेतातुन घरी येत असतांना ज्ञानेश्वर पाटील, रामेश्वर पाटील, गणेश पाटील, प्रवीण पाटील (थोरगव्हाण) या सर्वांनी मिळुन माझी मोटरसायकल अडवत शाब्दीक वाद घालुन शिविगाळ केली. प्रवीण पाटील व रामेश्वर पाटील याने लाथाबुक्क्याने व त्याच्या हातातील लाकडी काठीने पाठीवर पायावर मारहाण करून मला जीवे ठार मारण्याची धमकी. तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार गोरख पाटील हे करीत आहेत.

Copy