थेरगावातील गुन्हेगारावर पहिली एमपीडीए कारवाई

0

वाकड : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करणा-या एका सराईत गुन्हेगारावर वाकड पोलिसांनी घातक कारवाया प्रतिबंध कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली आहे. त्यानुसार त्याला एक वर्ष स्थानबद्ध करत येरवडा कारागृहात ठेवले आहे.  पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एमपीडीएची पहिलीच कारवाई आहे. अनिकेत अर्जुन चौधरी (वय 21, रा. पाषाणकर निवास, प्रेरणा शाळेजवळ, लक्ष्मण नगर, थेरगाव) असे गुन्हेगाराचे नाव आहे.

Copy