थरारक VIDEO: पत्त्यांच्या इमारतीसारखी कोसळली दुमजली इमारत !

0

नवी दिल्ली: दिल्लीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाने अक्षरश: कहर केला असून विविध भागात पाणी साचायला सुरूवात झाली आहे. झोपडपट्टीतील नाल्याजवळील एक दुमजली इमारत पत्त्यांच्या घरासारखी कोसळल्याचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. एएनआयने हा व्हिडीओ प्रसारित केला आहे. नाल्याच्या पाण्याला प्रचंड वेग होता. शिवाय वाहत्या पाण्यामुळे घरांच्या खालचा भागही काही प्रमाणात आधीच वाहून गेला होता. काही वेळातच दुमजली इमारत देखील नाल्यात कोसळली. दिल्लीत पावसामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. प्रसिद्ध मिंटो ब्रिजच्या खालीही पाण्याचा मोठा डोह तयार झाला आहे. याच ब्रिजच्या खाली पाण्यात एकाचा मृतदेह तरंगताना आढळला होता. तो मृतदेह एका पिकअप ड्रायव्हरचा होता. आता मिंटो ब्रिजच्या खालील पाण्याने भरलेला डोह पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Copy