त्सोंगाला रॉटरडॅम जागतिक टेनिस स्पर्धेत विजेतेपद

0

रॉटरडॅम (नेदरलॅंड्‌स) – रॉटरडॅम जागतिक टेनिस स्पर्धेत फ्रान्सच्या ज्यो-विल्फीड त्सोंगा याने विजेतेपद मिळविले आहे. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने बेल्जियमच्या डेव्हिड गॉफीनवर ४-६, ६-४, ६-१ अशी मात केली. त्याने कारकिर्दीत प्रथमच ही स्पर्धा जिंकली. २०११ मध्ये त्याला रॉबिन सॉडर्लिंगविरुद्ध अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते. त्याला सहावे मानांकन होते.

तिसऱ्या मानांकित गॉफीनने सलग दुसऱ्या आठवड्यात अंतिम फेरी गाठली होती, पण त्याला पुन्हा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मागील आठवड्यात सोफियातील स्पर्धेत तो ग्रिगॉर दिमीत्रोव याच्याकडून हरला होता. त्सोंगाच्या वैयक्तिक टेनिस कारकीर्दीत रॉटरडॅमधील हे पहिले विजेतेपद आहे. सहाव्या मानांकित त्सोंगाला 2011 साली या स्पर्धेत अंतिम सामन्यात रॉबिन सोडरलींगकडून पराभव पत्करावा लागला होता. रविवारच्या सामन्यात त्सोंगाने बेल्जियमच्या तृतीय मानांकित गोफीनला दोन तासांच्या कालावधीत पराभूत केले.