त्र्यंबकेश्‍वर विद्यालयात दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

0

रावेर । येथील त्र्यंबकेश्‍वर माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थचे अध्यक्ष दमयंती मोरे उपस्थित होत्या.

संस्थेचे चेअरमन त्र्यंबक तायडे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले तर मुख्याध्यापक राजेंद्र तायडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

याप्रसंगी चेअरमन त्र्यंबक तायडे यांनी शिक्षण क्षेत्राविषयी चौफेर विचार मांडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेेच्या कार्याबद्दल तसेच उपक्रमाबद्दल विचार मांडले. व विद्यार्थ्यांनी जीवनात आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक एम.एफ. तडवी यांनी केले तर आभार संजीव तायडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली जयश्री घिटे यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.