पिकलबॉलचा पहिला संघ बँकॉकला रवाना

0

मुंबई: पिकलबॉल या क्रीडाप्रकाराचा पहिला आंतरराष्ट्रीय संघ सज्ज झाला असून १८ व १९ फेब्रुवारीला होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी २३ सदस्यांचा भारतीय संघ शुक्रवारी बँकॉक (थायलंड) येथे रवाना झाला. ‘बँकॉक खुल्या पिकलबॉल’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेसाठी भारतातील २३ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.

संघामध्ये ५ मुंबईकरांचा समावेश असून राजस्थानचे सर्वाधिक १० खेळाडू भारतीय संघात आहेत. बिहारच्या रंजन कुमार गुप्ताकडे भारताची धुरा सोपविण्यात आली असून तो पिकलबॉल राष्ट्रीय संघाचा पहिला कर्णधार ठरला आहे. तसेच, मुंबईकर राहुलकुमार वाणी संघव्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडेल. राहुलसह सुनिल वालावलकर, मनिषा वालावलकर, मनिष राव आणि सचिन मांद्रेकर हे मुंबईकर खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करतील.