त्या रुग्णामुळे रस्ते, गल्लीबोळा ओस

0

जळगाव- कोरोनाचा रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर आज जळगावकर काहीसे धास्तावलेले दिसले. त्यामुळे मुख्य भागातील रस्ते, आतमधील गल्लीबोळा ओस पडल्या होत्या.
कालपर्यंत असलेली बेफिकिरी आज दिसत नव्हती. डॉ. सहस्त्रबुद्धे दवाखाना ते कोर्ट चौक हा रस्ता नेहमीच गजबजलेला असतो. लॉकडाऊनमुळे वर्दळीवर खूप काही फरक पडला नव्हता. मात्र, काल कोरोना रुग्ण निष्पन्न झाल्यानंतर आज खऱ्या अर्थाने लॉकडाऊन दिसला. सकाळपासून हा रस्ता ओस होता. १०-१५ मिनिटांनी एखादा माणूस दिसत होता. दुकानातील गर्दी गायब झाली होती.