‘त्या‘ जागांची उपमहापौर डॉ. सोनवणे यांनी केली पहाणी

0

जळगाव । चार जागांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव मागील महासभेत स्थगित करण्यात आले होते. 30 रोजी होणार्‍या महासभेच्या विषय पत्रिकेवर हे विषय ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे संबंधित जागांची उपमहापौर डॉ.अश्‍विन सोनवणे यांनी पाहणी केली. तसेच मनपा अधिकार्‍यांकडून देखील त्यांनी माहिती घेतली. महापालिकेची महासभा दि.30 रोजी होणार आहे. महासभेत शहराच्या मंजुर विकास योजनेमध्ये मेहरुण शिवार, पिंप्राळा, शिवाजी नगर भागातील काही जागांचे भूसंपादन करण्याबाबतचे विषय ठेवण्यात आले आहेत. हेच विषय मागील महासभेत सत्ताधारी भाजपाने स्थगीत केला होता. जागेच्या भूसंपादनासाठी जवळपास 25 कोटी द्यावे लागणार आहे. सद्यस्थितीला महापालिकेची आर्थिकस्थिती बिकट आहे. अशा परिस्थितीमध्ये भूसंपादन करणे योग्य ठरेल की नाही? यासंदर्भात उपमहपौर डॉ.अश्‍विन सोनवणे यांनी त्या चार जागांची पाहणी केली.

Copy