तोरणमाळच्या खाईतील बनावट दारूचा कारखाना उद्धवस्त

0

नंदुरबार: तोरणमाळपासून 15 कि.मी. खोल दरीत असलेल्या सिंधी दिगर गावात बनावट दारू बनविण्याचा कारखाना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उध्वस्त केला आहे. या भागात बनावट दारूचा
कारखाना सुरू असल्याची माहित पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित ,अपर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सिंदूरी दिगर गावात रात्री छापा टाकून कारवाई केली आहे.

या छाप्यात बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे 250 लिटर स्पिरिट, बनावट दारू बनवण्यासाठी लागणारे मशीन, काचेच्या खाली बाटल्या, बाटलीवरील बूच, बनावट स्टिकर तसेच सुगंधी द्रव्य तसेच 1260 टॅगो कंपनीचे विक्री करण्यासाठी बनविलेल्या बनावट दारूच्या बाटल्या असा एकूण 1 लाख 31 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हा मुद्देमाल म्हसावद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. बनावट दारू कारखाना चालविणाऱ्या इसमा विरुद्ध पोलिस नाईक विकास अजगे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रवींद्र पाडवी, विनोद जाधव, सजन वाघ, विकास अजगे, जितेंद्र तांबोळी, विजय ढिवरे, अभय राजपूत यांनी केली आहे.

Copy