…तोपर्यंत भाजपची राजस्थानमध्ये फ्लोअर टेस्टची मागणी नाही

0

जयपूर: राजस्थानमध्ये कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडली आहे. सचिन पायलटने बंड केल्याने कॉंग्रेसच्या अडचणीत वाढ झाली होती. मात्र आता कॉंग्रेसकडे बहुमत असल्याची खात्री झाल्यानंतर कॉंग्रेसने सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून दूरू केले आहे. पायलट यांच्यासहित दोन मंत्र्यांना देखील मंत्रीपदावरून हटविण्यात आले आहे. कॉग्रेसमधील दुफळीचा फायदा घेऊन भाजप सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. भाजपकडून कॉंग्रेसने बहुमत सिद्ध करावे अशी मागणी होईल असे बोलले जात आहे. मात्र भाजपने त्यास नकार दिला आहे. सरकारजवळ बहुमताचा आकडा नाहीय, याची खात्री होत नाही, तो पर्यंत बहुमत सिद्ध करण्याची मागणी करणार नाही असे दिल्लीतील भाजपा नेत्यांनी सांगितले. राजस्थान भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी कॉंग्रेसचे सर्व आरोप फेटाळले आहे.

‘हे भ्रष्ट सरकार आहे. करोना व्हायरसची स्थिती सुद्धा या सरकारला हाताळता आलेली नाही. हे कमकुवत सरकार आहे. लोकांच्या हिताच्या दृष्टीने हे सरकार गेले पाहिजे’असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया म्हणाले.

अशोक गेहलोत यांनी त्यांच्याजवळ १०९ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला. २०० सदस्यांच्या राजस्थान विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १०१ आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपाचे ७२ आमदार आहेत. त्याशिवाय त्यांना आरएलपीच्या तीन आमदारांचा पाठिंबा आहे.

Copy