तेलंगणा निवडणूक: भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध; दरवर्षी वाटणार १ लाख गायी

0

अमरावती-तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनामा समितीचे प्रमुख एनवीएसएस प्रभाकर आणि केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांची यावेळी उपस्थिती होती. तेलंगानामध्ये पक्षाची सत्ता आल्यास दरवर्षी एक लाख गायी मोफत वाटण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

युवकांच्या विकासावर भर
तेलंगणा विधानसभेसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करतांना भाजपने राज्यातील तरुणांना विशेषस्थानी ठेवले आहे. सरकारी नोकरदारांना खुश करण्यासाठी निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याचे आश्वासन दिले आहे. वाढती महागाई कमी करण्याचे आश्वासन देखील दिले आहे. शेतकऱ्यांना २ लाखांपर्यंत कर्जमाफी, विद्यार्थांना लॅपटॉप देण्यासह मध्यविक्री नियमित करण्याचे आश्वासन दिले आहे.

Copy