तुळजाई लोकसंवाद संस्थेकडून ‘ताण-तणाव’ विषयी मार्गदर्शन

1

जळगाव- जळगाव येथील मुलांचे बालगृह येथे तुळजाई संस्थेचे अध्यक्ष भूषण लाडवंजारी यांच्या वाढदिवसानिमित्त तुळजाई लोकसंवाद संस्था व संध्याप्रकाश फाऊंडेशन आणि दयावाण ग्रुप कडून ‘ताण तणाव व मानसिक संतुलन’ विषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक म्हणून दीपाली सोनवणे, जितेंद्र सोनवणे यांनी केले. या कार्यक्रमसाठी प्रमुख पाहुणे जिया संघटनेचे अध्यक्ष शरद नाईक, प्रकाश वंजारी, प्रमोद लाडवंजारी , विकास पाटील लोकसांवदचे अध्यक्ष शिरीष तायडे, नजर फाऊंडेशनचे दीपक सपकाळे, रेल्वे विभागाचे सुहास पाटील, दयावन गृचे अध्यक्ष दीपक वंजारी, पवन पाटील, हर्षल ढाकणे, सचिन लाडवंजारी, सागर धनाड, अष्टविनायक संस्थचे अध्यक्ष सुनील वाणी, मनीष चव्हाण, मयूर वंजारी, विक्रांत जाधव, हेमंत मांडोळे, संदीप तांदळे, दिनेश पाटील आदींनी यासाठी सहकार्य केले. मार्गदर्शन शिबीरसह फळ वाटप, आरोग्य पुस्तिका वाटप करण्यात आले.

Copy