तुळजाईनगरात तरुण पूजार्‍याचा विजेचा शॉक लागून मंदिरातच मृत्यू

0

जळगाव – शहरातील जुने जळगाव रोड परिसरात योगेश्‍वर नगरलगत असलेल्या तुळजाई नगर येथील साई गणेश मंदिरात बोअरवेल सुरु करत असतांना विजेच्या जोरदार धक्क्याने अनुपम मोहन प्रसाद वय 25 रा. योगेश्‍वर नगर या तरुण पूजार्याचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना आज 13 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मूळ मध्यप्रदेशातील सटना येथील रहिवासी अनुपम प्रसाद हे असून सात वर्षापासून तुळजाई नगर येथील साईगणेश या मंदिरात पूजारी म्हणून काम पाहत आहेत. योगेश्‍वर नगरात भाडे करारावर खोलीत वास्तव्यास आहेत. आईवडील गावाकडे असल्याने तसेच अनुपम प्रसाद हे अविवाहित असल्याने एकटेच राहत होते. रविवारी सकाळी अनुपम यादव पूजा करण्यासाठी तुळजाई नगर येथील साईगणेश मंदिरात आले. याठिकाणी स्वच्छता केल्यानंतर मंदिराच्या आवारात असलेल्या झाडावर लटकविलेल्या डीपीवर बोरअरवेलचे बटन दाबण्यासाठी गेले असता, त्यांना जोरदार धक्का लागला. यात ते खाली कोसळले व जागीच त्याचा मृत्यू झाला. प्रकाराची माहिती मिळाल्यावर शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रघुनाथअ महाजन यांच्यासह कर्मचार्यांनी घटनास्थळ गाठले. तसेच पंचनामा केला. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी दिपक जाधव यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Copy