तुर खरेदी केंद्र बंद केल्याने तालुका काँग्रेसतर्फे आंदोलन

0

जळगाव। जळगाव जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्रावर शेतकर्‍याच्या तूर खरेदी केली जात नाही. महाराष्ट्र शासना कडून नाफेड मार्फत जिल्ह्यातील तूर खरेदी केंद्र बंद केल्यामुळे शेतकरी अडचणी मध्ये आले असल्याने जळगाव तालुका कॉग्रेसच्या वतीने तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करून नायब तहसीलदाराना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले. जिल्हा कॉग्रेस भवन ते तहसील कार्यालया पर्यत बैलगाड्यावर तुरीचे पोते ठेऊन घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय वराडे यांच्या सह पदाधीकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
व्यापार्‍यांनी शेतकर्‍याचा गैरफायदा घेतला.

खरेदी केंद्रावर बारदान नसल्याने तसेच नाफेड खरेदी केंद्राच्या कुचकामी धोरणामुळे तूर खरेदीसाठी शेतकरी बांधवांना दिवस भर उन्हात उभे राहून सुद्धा वेळेवर शेतकर्‍यान कडून माल स्वीकारला जात नाही. गेल्या आठ दिवसा पासून उन्हात ताटकळत शेतकरी बांधवाना थांबावे लागत लागत आहे. मात्र नाफेड केंद्राच्या वतीने प्रक्रिया लांबणीवर टाकण्यात येत असल्याचा शेतकरी वैतागला आहे. . याचा फायदा व्यापार्‍यांनी घेतला. यामुळे व्यापारी शेतकर्‍याकडून 3500 ते 4 हजारा पर्यत माल खरेदी केला जात असल्याचा आरोप तालुका कॉग्रेने केला आहे.

शेतकर्‍यांना अच्छे दिन कधी?
जिल्ह्यात आज पर्यंत हजारो क्विंटल तूर विक्री अभावी नाफेड खरेदी केंद्रावर पडून आहे. गल्ली पासून ते दिल्ली पर्यत भारतीय जनता पार्टी चे सरकार असून आता पर्यत राज्यातील शेतकरी बांधवाना अच्छेदिन यायला हवे होते. मात्र आता देशाच्या पोशिंद्यानें अच्छेदिन ची अपेक्षा ठेवायची कशी असा? सवाल दिलेल्या निवेदनातून प्रशासनाला करण्यात आला आहे.शेतकरी बांधवाच्या हितासाठी नाफेड खरेदी केंद्र मार्फ़त तूर खरेदीची मुदत वाढ देण्यात यावी. तसेच नाफेड खरेदी केंद्राच्या व्यवस्थापकाची चौकशी करण्यात यावी अशा विविध मागण्या तालुका कॉग्रेसने निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहे.