तुर्कीत दहशतवादी हल्ल्यात 39 ठार

0

इस्तंबुल : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमा दरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 39 नागरिक ठार तर 40 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. तुर्कीमधील इस्तंबुल शहरात रिना नाईट क्लबमध्ये ही घटना घडली. नवीन वर्षाच्या सुरवातीलाच दहशतवाद्यांनी जगभरात पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण पसरवले आहे. या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये सोळा परदेशी नागरिक आहेत. सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. एका पोलिस अधिकार्‍याला प्रथम लक्ष्य करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमात सहभागी झालेल्या नागरिकांवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये अनेकजण जागीच गतप्राण झाले. अद्याप कुठल्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

कट्टरवाद्यांचा हल्ला
इस्तंबुलचे गव्हर्नर वासीप शाहीन यांनी सांगीतले की, सांताक्लॉजच्या वेशात आलेल्या दहशतवाद्यांनी नवीन वर्षाच्या पार्टीसाठी नाईट क्लबमध्ये आलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 39 नागरिक ठार झाले. यामध्ये 16 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. तर 40 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. हा हल्ला कट्टरवाद्यांनी केला आहे.