तुरीच्या पहिल्या टप्प्याची रक्कम प्राप्त

0

रावेर। नाफेडने खरेदी केलेल्या तुरच्या पहिल्या टप्याची रक्कम खरेदी-विक्री संघाकडे प्राप्त झाली असून तुर दिलेल्या शेतकर्‍यांचे कार्यालयात बँक पासबुक, आधार कार्डची झेरॉक्स द्यावी जेणेकरुन संबंधीत शेतकर्‍यांच्या प्रत्यक्ष रक्कम जमा होईल असे कळविण्यात आले आहे. 9 च्या आत दिलेली तुरची रक्कम 74 लाख 40 हजार 257 रुपये प्राप्त झाले आहे. बाजार समिती मार्फत खरेदी विक्री संघाने आता सुमारे पावणेतीन कोटींची 5 हजार 350 क्विंटल तुरची खरेदी केली आहे तर मार्केटला अजुन दहा हजार शेतकर्‍यांनी तुर विक्रीसाठी नाव नोंदलेले आहे.

बारदानचा पुरेसे साठा
दरम्यान मध्यंतरी बारदान नसल्याने तुर खरेदी केंद्र बंद होते परंतु प्रशासना कडुन योग्य वेळेत बारदान पुरवठा केल्याने तुर खरेदी सुरळीत झाली. जिल्हात एकमेव खरेदी केंद्र सुरु असल्याने येथे रावेर, मुक्ताईनगर, यावल तालुक्यातील शेतकर्‍यांनी येथे नाव नोंदलेले आहे त्यामुळे विक्रमी तुर खरेदी होण्याचा अंदाज आहे. नाफेडमार्फत आलेली तुरीची रक्कम संबधित शेतकर्‍यांच्या थेट खात्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर बँक पासबुक, आधार कार्ड जमा करावे असे आवाहन खरेदी विक्री संघांचे विनोद चौधरी, मार्केट कमेटीचे सचिव गोपाळ महाजन यांनी केले आहे.