‘तुम्बाड’ चित्रपटासाठी सोहम शाहची जोरदार मेहनत

0

मुंबई : अभिनेता सोहम शाह अत्यंत अनोख्या अवतारात त्याच्या आगामी ‘तुम्बाड’ चित्रपटात दिसणार आहे.

चित्रपटाच्या कथेनुसार सोहमला भर पावसात एक महत्त्वाचा सीन शूट करायचा होता. जवळपास याचे शूटींग महिनाभर चालले. सतत भिजल्यामुळे त्याची तब्येत खराब झाली. तरीही त्या परिस्थितीत त्याने शूट केले.

पावसातल्या शूटींगचा अनुभव सांगताना सोहम म्हणाला, ”काही महिन्यापासून आम्ही पावसात शूटींग करीत होतो. सीनची कंट्यूनिटी राखणे आवश्यक होते. असेही प्रसंग होते जिथे मला कपडे सुखवावे लागायचे आणि पुन्हा मला ओले करावे लागायचे. एक प्रसंग असा आला की पाऊस माझ्यासाठी धोकादायक बनत चालला होता. यामुळेच मी इश्वराकडे प्रार्थना करतो की, मला पुन्हा पावसात शूट करावे लागू नये.”

‘तुम्बाड’चा दमदार टीझर रिलीज झाले आहे.

Copy