‘तुमच्या स्वप्नांना गवसणी घाला’

0

नवी दिल्ली । आजचा दिवस म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी आहे. आजच्या दिवसांचं वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या 2011 सालच्या क्रिकेट वर्ल्डकप विजयाला आज 6 वर्ष पूर्ण होत आहेत. आज याबाबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने स्वत: ट्वीट करत याविषयी आनंद व्यक्त केला आहे. या ट्वीटमध्ये त्याने ‘चेस युअर ड्रीम्स’ असा संदेशही दिला आहे. तुमची स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचा पूर्ण प्रयत्न करा. स्वप्नांवर गवसणी घाला. कारण स्वप्ने खरी होतातच. 2011 चा वर्ल्डकप विजय हा माझ्यासाठी असाच एक क्षण होता असे सचिनने त्याच्या ट्वीटमध्ये कमेन्ट दिले आहे. कपिलदेवच्या नेतृत्वाखाली भारताने 1983 साली क्रिकेट वर्ल्डकप पटकावल्यानंतर वर्ल्डकपने भारताला सतत हुलकावणी दिली होती.

2011 च्या वर्ल्डकप विजयाला 6 वर्षे पूर्ण
सचिन तेंडुकरचा भारताच्या क्रीडाक्षितिजावर उदय झाल्यावर दोन दशकं भारताला क्रिकेट वर्ल्डकप मिळाला नव्हता. सचिनसारख्या महान खेळाडूच्या कारकीर्दीत भारताला वर्ल्डकप मिळणार नाही का? अशी भीती सातत्याने व्यक्त केली जात होती. 2011 च्या वर्ल्डकप विजयाने यावर पडदा पडला. 2011 च्या फायनलमध्ये भारताने श्रीलंकेला हरवत वर्ल्डकपवर आपलं नाव कोरलं होतं. या मॅचच्या दरम्यान सगळ्यांच्या लक्षात राहणारी प्रतिमा म्हणजे शेवटच्या बॉलवर कॅप्टन धोनीने मारलेला सिक्स आज भारताच्या या पराक्रमाला 6 वर्ष पूर्ण झाल्याचा आनंद त्यावेळी भारतीय टीममध्ये असणार्‍या अनेक खेळाडूंनी ट्वीट करत साजरा केलाय.