तुमच्या आई-वडीलांनी नक्कीच असे बोलायला शिकवले नसेल – ऋषी कपूर

0

मुंबई : आपल्या भाषेवर लक्ष दे, तुमच्या आई-वडिलांनी नक्कीच तुम्हाला असे बोलायला शिकविले नसेल, अशा शब्दांत बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी पाकिस्तानी महिलेला चांगलेच झापले आहे. ऋषी कपूर ट्विटरवर आपल्या बेधडक आणि काहीशा वादग्रस्त ट्विटने आपली बाजू मांडत असतात. ऋषी कपूर यांनी पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावल्याच्या पार्श्‍वभूमीवर ट्विट केले होते. त्यांच्या ट्विटला कॉमेंट केल्यावर पाकिस्तानी महिलेला ऋषी कपूर यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

एखाद्या प्रकरणावर ऋषी कपूर यांनी ट्विट केले की, नेटिझन्स त्यांच्या ट्विटवर कॉमेंट करतात. भारताला दुःख आहे की अभिनेते, चित्रपट आणि स्पोर्ट्स दोन्ही देशांमध्ये शांततेचा प्रयत्न पुन्हा अपयशी ठरला. पाकिस्तानला केवळ तिरस्कार हवा. पाकिस्तानला तणाव आवडत असेल तर ठीक आहे. कारण, टाळी एका हाताने वाजत नाही, असे ट्विट ऋषी कपूर यांनी केले असता नेटिझन्सने त्यांच्या ट्विटला काँमेट्स देण्यास सुरुवात केली. पाक नागरिकांचे काँमेट्स येत असतानाच पाकिस्तानी महिलेने चक्क शिवीगाळ केली. त्यामुळे ऋषी कपूर त्या पाकिस्तानी महिलेवर चांगलेच भडकल्याचे दिसले. यानंतर ऋषी कपूर आणि संबंधित महिलामध्ये चांगलीच खडाजंगी उडाली. आपल्या भाषेवर लक्ष दे, तुमच्या आई-वडिलांनी नक्कीच तुम्हाला असे बोलायला शिकवले नसेल, अशा कडक शब्दांत ऋषी कपूर यांनी पाकिस्तानी महिलेला चांगलेच सुनावले. त्यामुळे पाकिस्तानच्या निर्णयाचे खटके ट्विटरवरही उडाल्याचे दिसून आले.