तुमचे राजकारण सोडा, मराठा समाजासाठी आजी-माजी मुख्यमंत्री एकत्र या

0

तुळजापूर: मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. यावरून मराठा समाज संतप्त झाला आहे. राज्य सरकारने आरक्षणाचा विषय मार्गी लावावा यासाठी मराठा समाजाने आंदोलन देखील सुरु केले आहे. दरम्यान आज शुक्रवारी तुळजापूर येथे मराठा समाजाचा मेळावा झाला. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री यांनी एकत्र येऊन मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले आहे.

‘तुमचे राजकारण सोडा, समाजासाठी एकत्र या’ असे संभाजीराजे यांनी म्हटले आहे. तसेच यावेळी त्यांनी समाजबांधवांना शांततेचे आवाहन केले आहे. आंदोलन करतांना कोणत्याही अनुचित प्रकार अवलंबवू नका असेही त्यांनी सांगितले आहे.

मराठा समाजाला न्याय देण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचे आरोप विरोधकांकडून केले जात आहे. मराठा समाजाच्या आरक्षणावरून राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे, यावरून संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Copy