तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

0

नागपूर: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. दरम्यान नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढेंना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करून याबद्दलची माहिती दिली. त्यांनी कोरोनाची लक्षणे दिसत नाहीये. मात्र त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नियमानुसार मी स्वत:ला आयसोलेट करून घेतले आहे. गेल्या १४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढेंनी केले आहे. तुकाराम मुंढे हे त्यांच्या कामगिरीमुळे संपूर्ण राज्याला परिचित आहे. पदाधिकारी विरुद्ध तुकाराम मुंढे असेच चित्र आजपर्यंत राहिले आहे. ज्या ठिकाणी ते सेवा देतात, तेथील प्रशासनाला वेगळीच शिस्त असते हे आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राने पहिले आहे.

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि कोरोना बाधितांची लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. नागपूर शहरातील खासगी रुग्णालयांवर महानगरपालिकेचा वॉच ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये पालिकेनं घालून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी होते की नाही यावर विशेष पथक लक्ष ठेवणार आहे. मनपाचं विशेष पथक रुग्णालयांची अचानकपणे पाहणी करणार आहे. तसेच काही आक्षेपार्ह आढळल्यास तात्काळ कारवाईचा बडगाही उगारणार आहे.

Copy