तुकाराम मुंढेवर आरोप करतांना लाज वाटली पाहिजे:अंजली दमानिया

0

नागपुर:- राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरकीडे तुकाराम मुंढे आणि नगरसेवक हा वाद पुन्हा एकदा चिघळला आहे. नागपूर महानगरपालिकेचे महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढेंविरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तुकाराम मुंढे यांच्यावर २० कोटींचा घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. अंजली दमानिया यांनी ट्विट करत काय घाण राजकारण चाललंय नागपुरात? अशा शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “काय घाण राजकारण चाललंय नागपुरात? तुकाराम मुंढेंवर वर आरोप? लाज वाटली पाहिजे या महापौरांना, अशा शब्दात टीका केली आहे.

तुकाराम मुंढे नकोसे झाले आहेत म्हणून काटा काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय असा आरोप दमानिया यांनी केला आहे.
तुकाराम मुंढे अतिशय सरळमार्गी आणि तत्ववादी आहेत ते. तुम्हाला ते नकोसे झाले आहेत म्हणून काटा काढण्याचा प्रयत्न होताना दिसतोय”.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे शनिवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा अर्ध्यावर सोडून निघून गेल्यानंतर महापौर आणि आयुक्त यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले.

Copy