तीन हजार लिटर रॉकेल पोलिसांनी केले जप्त

0

भुसावळ । सावदा येथून जामनेरकडे ट्रकची तपासणी करण्यात आली असता यामध्ये निळे रॉकेल काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचे उघडकीस आले आहे. यावल नाक्यावरील महात्मा गांधी पुुतळ्यासमोर या ट्रकची 22 रोजी रात्री 1 वाजेच्या सुमारास तपासणी करण्यात आली होती. यात पोलीसांनी 3 हजार लिटर निळ्या रॉकेलसह 6 लाख 34 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त
केला आहे.

शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
शहरातील यावल नाक्यावरील गांधी पुतळ्याजवळ रात्री 1 वाजेच्या सुमारास वाहनांची तपासणी करीत असताना सावदा येथून जामनेरकडे जाणार्‍या ट्रक क्रमांक एम.एच- 19, झेड- 6450 या वाहनाची तपासणी केली असता यात 3 हजार लिटर निळे केरोसिनने भरलेल्या 15 बॅरल आढळून आल्या याची तपासणी केली असता शेख आरीफ शेख रसुल (वय- 38, रा. मदीना नगर, जामनेर) याने सावदा येथील सुनिल (पुर्ण नाव माहित नाही) यांच्याकडून शासकीय कोट्यातील रॉकेल घेवून ते काळ्या बाजारात इंधन वापरासाठी विकत घेवून ते अवैधरित्या वाहतुक करताना आढळून आला. तहसिल कार्यालयातील पुरवठा अधिकारी आर.एल. राठोड यांनी तपासणी करुन पंचनामा केला. यानंतर हा मुद्देमाल पोलीसांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक फौजदार प्रकाश पाचपांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलीस स्थानकात शेख आरीफ शेख रसुल व सुनिल यांच्या विरुध्द जिवनावश्यक वस्तू अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका खैरनार या करीत आहे..