Private Advt

तिहेरी अपघातात पिंपळगाव गोलाईतच्या तरुणाचा मृत्यू

जामनेर : दोन दुचाकींसह ट्रकमध्ये अपघात घडल्यानंतर पिंपळगाव गोलाईत गावातील तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एकाची प्रकृती गंभीर आहे. तालुक्यातील पिंपळगाव गोलाईतजवळ बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात सुशांत सोनवणे (पिंपळगाव गोलाईत) याचा मृत्यू झाला.

तिघे किरकोळ जखमी
जामनेर तालुक्यातील तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे बुधवारी रात्री दोन दुचाकी आणि ट्रक यांच्यात अपघात होवून त्यात पिंपळगाव गोलाईत गावातील तरुण सुशांत सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला तर अजय पाटील (पाळधी) हा तरुण गंभीर जखमी झाला या शिवाय शेख अर्षद शेख हरूण, समीर शेख जाकीर व अजय पाटील हे जखमी झाले. जखमींवर जळगाव येथे उपचार सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच परीसरातील नागरीकांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली.