ताहिरा कश्यपला पुन्हा कॅन्सरचं निदान

0

मुंबई : अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपला पुन्हा एकदा कॅन्सरचं निदान झालं आहे. मध्यन्तर ती बरी झाली होती मात्र आता पुन्हा तिला कॅन्सर चा निदान झालं आहे. आपल्याला स्टेज 0 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झाल्याची माहिती तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यावर तिने उपचारही घेतले. किमोथेरेपीचे सहा सेशन्स आणि मास्टेक्टॉमीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर ताहिराला पुन्हा एकदा स्टेज 1a ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित ताहिराने सांगितले.

कॅन्सर कोणालाही होऊ शकतो त्यामुळे जर अशी लक्षणं दिसू लागली तर स्वत:ची काळजी घ्या, आधी चाचणी करा योग्य उपचार घ्या, धीरानं या परिस्थितीचा सामना करा असं तिनं पोस्टद्वारे सांगितलं आहे.

Copy