तासखेडा गावात मध्यरात्री जि.प.शाळेच्या मैदानावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची केली स्थापना

A statue of Chhatrapati Shivarai was installed by unknown persons on the playground of Tashkheda Z.P. School सावदा : तालुक्यातील तासखेडा येथिल जि.प. शाळेच्या पटांगणावर रात्री काही अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळा बसवल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर गावात प्रचंड खळबळ उडाली. पाहता-पाहता ग्रामस्थांची मोठी गर्दी वाढली तर सावदा पोलिसांना माहिती कळवल्यानंतर सावद्याचे सहाय्यक निरीक्षक डी.डी.इंगोले यांनी आपल्या कर्मचार्‍यांसोबत घटनास्थळी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले तसेच प्रशासनाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करून पुतळा शाळेच्या खोलीत हलवण्यात आला.

गावात लावला बंदोबस्त
रावेर तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनीदेखील भेट घेत घडला प्रकार जाणून घेतला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विधीवत पूजेनंतर तहसीलदारांनी सोबत नेला. या घटनेचा गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. माजी आमदार राजाराम गणू महाजन, भाजपाचे शिवाजी पाटील, राहुल कांबळे, ग्रामसेवक शरद पाटील, तलाठी, सरपंच, सदस्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.