बोराडी येथे नॉन कोविड सेंटरसाठी आयुर्वेदिक महाविद्यालय सज्ज

शिरपूर -तालुक्यात वाढता कोरोना प्रार्दुभाव व रुग्ण संख्या लक्षात घेता बोराडी येथे व्यंकटराव तानाजी रंधे आयुर्वेदिक महाविद्यालयात नॉन कोडीड सेंटर उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी प्रशासनाकडून ५० ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे.कोविड सेंटर उभारणीचे काम प्रगती पथकावर असून कामांची पाहणी करण्यासाठी नुकतीच शिरपूर तहसीलदार आबा महाजन यांनी बोराडी येथील आयुर्वेदिक महाविद्यालयातील कोविड सेंटरला भेट दिली.

तालुक्यात दररोज कोविड १९ विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढते आहे.कोरोना चाचणी करणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. गंभीर लक्षणे असलेले, ऑक्सिजनची आवश्यकता असलेले, वृद्ध आदी रुग्णांवर उपचारासाठी नॉन कोविड सेंटर ची आवश्यकता होती. सध्या या रुग्णालयात कोरोनाशी संदर्भित तपासण्या, औषधोपचार व अन्य उपचार यावर सर्वाधिक भर आहे. कोरोनाप्रसाराची परिस्थिती आणखी बिकट झाल्यास बेड्सची संख्या वाढवणे अत्यावश्यक होते..याशिवाय कोरोनाचे निष्पन्न रुग्ण,संशयित प्रसारक आणि त्यांच्यामुळे इतर कोरोनाबाह्य आजारांचे रुग्ण,प्रसूतीसाठी दाखल स्त्रिया,अपघाताचे रुग्ण आदींना होऊ शकणारा धोका पाहता प्रांताधिकारी बांदल यांनी व्यंकटराव तानाजी रंधे आयुर्वेदिक महाविद्यालयात संपूर्ण कोविड सेंटर घोषित केले आहे.

तहसिलदार आबा महाजन यांनी भेटी प्रसंगी आवश्यक सुविधा पुरविल्याबाबत व्यंकटराव तानाजी रंधे आयुर्वेदिक महाविद्यालय बोराडी तसेच ग्रामपंचायतींच्या कामाचे कौतुक केले. बोराडी येथील कोविड केअर सेंटरला तसेच इतर रुग्णांच्या आरोग्याची व्यवस्थित रित्या सोया व्हावी म्हणून बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला तहसिलदार आबा महाजन यांनी भेट देऊन इतर रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांची देखील पाहणी केली.याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी तसेच बोराडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.चेतना महाले,शाम पावरा आदीं उपस्थित होते.