तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात

0

चाळीसगाव : आचार्य गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथी निमित्त दी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटी प्रताप माध्यमिक विद्यालय वडगाव बु॥ व श्री माताजी चॅरिटेबल ट्रस्ट, श्री माताजी दातांचा दवाखाना डॉ.विशाल पाटील डॉ. अर्चना पाटील आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत आचार्य गजाननराव गरुड यांच्या संपूर्ण जीवनावर आधारीत चित्र संचायनी चेफित कापून उद्घाटन डॉ. विशाल पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. वसतिगृहाच्या 72 विद्यार्थ्यांना थंडीचे दिवस असल्यामुळे थंडीपासून बचाव व्हावा म्हणून जाड लोकरीचे रग (पांघरून)वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
प्रमुख अतिथी शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे सचिव दीपक गरुड, वसतिगृह अधीक्षक अशोक देशमुख, हेड कलॅर्क राजेन्द्र गरुड, भैय्या देशमुख, आर.डी. निकम (मुख्यध्यापक तांदुळवाडी), श्री. पाखले (मुख्यध्यापक वाडे),श्री शेख (मुख्यध्याापक नगरदेवला), सुनील पाटील सर (मुख्यध्यापक भडगाव प्रसिद्ध व्याख्याते),पर्यवेक्षक बावसकर सर व्याख्यते(नगरदेवला), श्री. कुमावत(पाचोरा), अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक आंबरसिंग गुरुजी, कोमलसिंग पाटील, दिनकर पाटील, मधुकर पाटील, पो.पा. विजय पाटील, दीपक माळी, हिंमत पाटील, प्रवीण पाटील, वाल्मिक मोरे, रवींद्र मोरे यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक एस.के.राठी (मुख्यध्यापक वडगाव) यांनी केले. सूत्रसंचालन पंकज राजपूत यांनी केले.

विजेत्यांना दिले बक्षिस
स्पर्धेतील बक्षीस पात्र विद्यार्थी याप्रमाणे, लहान गट -सलोनी सावंत (आदर्श कन्या विद्यालय, भडगाव), रक्षा बोरसे (तांदुळवाडी), जयदीप पाटील (प्रताप माध्यमिक विद्यालय वडगाव). मोठा गट – रितेश पाटील (सौ.सु.गी. पाटील भडगाव), अश्विनी मोरे (जवाहर हायस्कूल, गिरड), रतनलाल पाटील (प्रताप माध्यमिक विद्यालय, वडगाव). स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वडगाव यांनी परिश्रम घेतले.