तामीळनाडूनंतर आता नागालँडमध्ये सत्तापालट

0

कोहिमा । नागालँडमध्ये शनिवारी झालेल्या राजकीय उलाथापालथीनंतर सत्तारूढ असलेल्या नागा पिपल्स फ्रंटने (एनपीएफ) राज्यातील एकमेव खासदार नेफियू रियो यांना पक्षाच्या गटनेतेपदासाठी पाठिंबा जाहीर केला आहे. राज्यातील या राजकीय घडामोडीमुळे टी.आर.जेलियांग यांना मुख्यमंत्र्याची खूर्ची सोेडावी लागणार आहे. पक्षाच्या आणि अपक्ष आमदारांसहित 50 पेक्षा जास्त आमदारांनी रियो यांची गटनेतेपदी करण्याबाबतच्या पत्रावर सह्या केल्यानंतर नागालँडमधील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. अपक्श आमदारांसह एनपीएफचे आमदार आसाममधील काझीरंगा नॅशनल पार्कमधील एका रेसार्टमध्ये मुक्काम ठोकून आहेत. त्यामुळे सत्ताबदलासाठी हे आमदार जेलियांग किंवा रियो यांच्याशी चर्चा करणार आहेत.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याच्या मुद्दावरुन राज्यात सत्तापालट करण्याच्या हालचालींनी वेग घेतला होता. त्यावेळी सरकार आणि आंदोलक यांच्यातील कोंडी फोडण्यासाठी बुधवारी 49 पैकी 42 आमदारांनी गेटानेता म्हणून एनपीएफचे सर्वेसर्वा शुरहोजेलिए लीजित्सू यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र मंत्रीमंडळातील काही कॅबिनेट मंत्र्यासहित किमान 20 आमदारांनी लिजित्सू यांना गटनेते बनवण्यास विरोध केला होता.

नागालँडच्या 60 सदस्यांच्या विधानसभेत डेमोक्रेटिक अलायन्स ऑफ नागालँडच्या युतीच्या सरकारात एनपीएफचे 48 आमदार आहेत. त्यात निलंबित आमदार इमकोंग इमचेन, भारतीय जनता पक्षाचे चार आणि आठ अपक्ष आमदारांचा समावेश आहे. महिला आरक्षणावरून सुरू झालेल्या शांततापूर्ण आंदोलनाने नंतर हिंसक रुप धारण केले होते. हे आंदोलनाला नियंत्रित करण्यासाठी मुख्यमंत्री जेलियांग यांनी सर्व प्रयत्न केले होते. पण आंदोलकांनी मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती.