तापी बुराई सिंचन योजनेसाठी मुख्यमंत्र्यांकडून भरीव निधीचे आश्वासन

0

तापी बुराई उपसा सिंचन संघर्ष समितीचे निमंत्रक सतिष पाटील यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नंदुरबार। तापी बुराई उपसा सिंचन योजनेच्या कामाकडे स्थानिक नेत्यांनी पाठ फिरविल्यामुळे संघर्ष समितीचे निमंत्रक तथा शिंदखेडा पंचायत समितीचे सदस्य सतिष पाटील यांनी भाजपचे वरिष्ठ नेते माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या मध्यस्थीने विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याशी संबंधित असलेला सिंचन योजनांचा प्रश्न असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक चर्चा करून या योजनेच्या कामासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन दिले आहे अशी माहिती सतिष पाटील यांनी दिली.

माजीमंत्री एकनाथराव खडसे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसा सिंचन प्रकल्पाला निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देण्याबरोबरच ही योजना लवकरात लवकर पंतप्रधान कृषि सिंचाई योजनेत समाविष्ठ करण्यासाठी आदेश केलेत,शिंदखेडा तालुक्यातील गुरुदत्त उपसा सिंचन,व महात्मा फुले सिंचन या लिफ्टला लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे देखील आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे,त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

या योजनेमुळे शिंदखेड़ा, नंदूरबार, साक्री तालुक्यातील किमान 100 ते 150 गावांचा कायम स्वरूपी पाण्याचा प्रश्न सूटनार आहे, दांडेकर समितीच्या अहवालात 87 दुष्काळी तालुक्याची यादी दिली आहे ,त्यात शिंदखेडा नंदुरबार साक्री तालुक्यातील पूर्व भाग यांचा समावेशआहे,त्यामुळे जलसिंचन योजना उपलब्ध करून देण्याचे राज्य व केंद्र शासनाचे धोरण आहे.

सन १९९९ साली प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजनेस मान्यता मिळाली. तापी नदीच्या पुरात वाहून जाणारे पाणी पंप गृह बांधून लोखंडी पाईपा द्वारे उचलून चार टप्प्यात टाकावे, या योजनेमुळे नंदूरबार तालुक्यातील पूर्व भाग शिंदखेड़ा तालुक्यातील छोटा अमरावती, मालपुर येथील अमरावती धरण, वाडीशेवाडी धरण, तसेच या धरणामुळे चिमठाने, शिंदखेड़ा, व विखरण तलाव भरणार आहेत,शनिमांडल लघुपाटबंधारे योज़ना व प्रस्तावीत निंभेल, आसाने या लहान योजनाद्वारे पाणी मिळणार आहे.

ही योजना सुरुवातीला बुराई धरणाची उंची वाढवुन खालचे धरण भरणार होती, बुराई धरणाची ऊंची वाढवली तर सक्रि तालुक्यातील आखाड़े व फोफादे ही गांवे कायम स्वरूपी उठनार होती,त्यामुळे या गावांचा विरोध होता,शिवाय शासनाला देखील मोठा खर्च येणार होता,म्हणून 2014 साली या योजनेत बदल करण्यात आला,त्यानुसार आता हाटमोहिदा येथून तापी नदीवर पम्पिंग करून एका बाजूने येणारे आसाने,निभेल, साठवण तलाव ,बलदाने धरण, अमरावती धरण, वाड़ीशेवाडी धरण, बुराई धरण ,शनिमांडळ धरण, त्या ठिकाणी व्हाल ठेऊन धरण भरून घेण्याची मंजूरी मिळून घेतली.

फक्त 30 ते 35 टक्के काम
गेल्या चार वर्षी पासून संघर्ष समितीच्या माध्यमातून वेग वेगळी आंदोलने सुरु केली आहेत,शेतकऱ्याच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या या योजनेचे काम मात्र चमत्कारिक रित्या संथ गतीने सुरू आहे,स्थनिक नेत्यांनी देखील याकडे पाठ फिरवली आहे,म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून आम्ही विधान भवनात पोहचलो आणि योजनेला गती देण्यासाठी निधीची मागणी निवेदनातून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कडे केली,त्यांनीही ठोस आश्वासन देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे, अशी माहिती सतिष पाटील यांनी दिली.