VIDEO: तापी नदी पुलावरील कठडे तोडत अज्ञात वाहन पाण्यात

0

शिरपूर: धुळ्याकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने येणारे अज्ञात वाहन मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे पुलावरून पाण्यात पडल्याची घटना शुक्रवारी २८ ऑगस्ट रोजी सकाळी उघङकीस आली. पहाटे २ ते ३ वाजेदरम्यान ही घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाहनाचा टायर फुटला असावा किंवा चालकाला डुलकी लागल्याने ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. आजपर्यंत वाहन हे पुलाचा कठङा तोङुन पङल्याची नदीपात्रात पडल्याची घटना घडली आहे. लक्झरी की ट्रक याबाबत अधिक माहिती अद्याप ही उपलब्ध होऊ शकली नाही घटनास्थळी नरङाणापो.स्टे पोलिस , महामार्ग पोलिस सुरक्षा पथकचे कर्मचारी व शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी पोहचले असुन चौकशी करीत आहेत.