तान्हाजी चित्रपट महाराष्ट्रात टॅक्स फ्री होणार !

0

मुंबई : मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत दिग्दर्शित आणि अभिनेता अजय देवगण मुख्यभूमिकेत असलेला बहुचर्चित ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ हा सिनेमा १० जानेवारीला प्रदर्शित झाला. हा सिनेमा मोठी कमाई करणार हे सुरुवातीपासूनच सांगितले जात आहे. दरम्यान चार दिवसात तान्हाजीने 75.80 कोटींची कमाई केली आहे. तान्हाजी चित्रपटाला महाराष्ट्रात करमुक्त करण्यात यावे अशी मागणी होत आहे. उत्तर प्रदेशात तान्हाजी करमुक्त करण्यात आला आहे. दरम्यान आता महाराष्ट्रात देखील हा चित्रपट करमुक्त करण्यात येईल अशी माहिती महाविकास आघाडीचे मंत्री कॉंग्रेस नेते नितीन राऊत यांनी दिली. तान्हाजी हा चित्रपट महाराष्ट्रात अधिक बघितला जातो आहे. चित्रपटातील कथानक हे महाराष्ट्राशी संबंधित असल्याने महाराष्ट्रात या चित्रपटाला करमुक्त करण्यात यावे अशी मागणी होत आहे.

Copy