ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी !

0

मुंबई:मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेल उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानमधून दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देणारा फोन आला होता. यानंतर ताज हॉटेलच्या बाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानमधील कराची येथून ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट करत उडवून देण्याची धमकी देण्यात आली. धमकी आल्यानंतर ताज हॉटेल आणि आसपासच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोबतच ताज हॉटेल समुद्राला लागून असल्याने समुद्रात गस्त वाढवण्यात आली असून लक्ष ठेवलं जात आहे.

धमकी देणारा फोन पाकिस्तानमधील नंबरवरुन आला होता. फोन आला त्या नंबरची पूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस सध्या करत आहेत.

Copy