Private Advt

तांबापुर्‍यातील चिमुकल्याचा विद्युत शॉक लागल्याने मृत्यू

जळगाव : तांबापूरा भागातील हनुमान मंदीराच्या पटांगणात खेळत असलेल्या पाच वर्षीय चिमुकल्याचा विजेचा जोरदार धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाला. नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला. तुषार उर्फ आरू शिवाजी सुरवाडकर (5, गवळीवाडा, तांबापूरा, जळगाव) असे मयत चिमुकल्याचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
गवळीवाडा येथील हनुमान मंदीराच्या पटांगणात तुषार सुरवाडकर हा चिमुकला व त्याचा मोठा भाऊ महेश आणि गल्लीतील काही मुले गुरूवार, 7 एप्रिल रोजी सायंकाळी खेळत होते. त्यावेळी मंदीराच्या संरक्षण भिंतीच्या लोखंडी जाळीला तुषारचा स्पर्श झाल्याने त्याचा विजेचा जोराचा धक्का बसला आणि तुषारचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत इतर खेळत असलेले लहान मुले बचावले आहे. या घटनेची माहिती मिळताचा नातेवाईकांना घटनास्थळी धाव घेवून हंबरडा फोडला. एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.