तांदलवाडीत केंद्रीय आरोग्य पथकाकडून 40 जणांच्या रक्ताचे नमूने घेतले

3

खिर्डी : तालुक्यातील तांदलवाडी येथे र्ीांरोग्य सेवा संचालनालर्यें पुणे यांच्या अंतर्गत कोविड 19 संदर्भात आयसीएमआरतर्फे केंद्रीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. यात येथील 18 वर्षावरील 40 जणांच्या रक्ताचे नमूने घेण्यात आले. नव्याने संशोधन त्यावर करण्यात येणार असून कोरोनासाठी लोकांमध्ये किती रोगप्रतिकार शक्ती आहे, रक्तात अँटीबॉडीज तयार होत आहेत का ? या बाबी तपासणीतून समोर येणार असल्याचे पथकातील डॉक्टरांनी सांगितले. जिल्हयातील दहा गावामधून दहा टिमपयेज्ञक्षी प्रत्येकी 40 जणांची तपासणी करून असे जिल्ह्यातील 400 सॅम्पल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. हे सॅम्पल पुढील तपासनीसाठी चेन्नईला जाणार आहेत. यात तालुक्यातील तांदलवाडी या गावाची निवड करण्यात आली. यावेळी आलेल्या पथकाचे विकास इंगळे यांच्यासोबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शिवराय पाटील, थोरगहाण प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कुणाल मोरे, डॉ.सारंग पाटील, सतीश महाजन, आर.के.पाटील, सरपंच श्रीकांत महाजन, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आरोग्य सेवक, आरोग्यसेविका, पोलिस पाटील सुधाकर चौधरी, आशा वर्कर, परीचारिका व तांदलवाडी ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.

Copy