Private Advt

तहसील कार्यालयाचाच वीज पुरवठा झाला खंडित ; तर महसूल अधिकाऱ्यांनी वीज कार्यालय केले सिल

नंदुरबार प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने तहसील कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केला आहे .  तर दुसरीकडे महसूल अधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन कार्यालयच सील केल्याची घटना सोमवारी दुपारी घडली.

एक प्रकारे या दोन्ही विभागात थकबाकी वसुली चे युद्धच जणू रंगल्याचे चित्र नागरिकांनी पाहिले. वीज वितरण कंपनीची महसूल विभागाकडे थकबाकी होती, म्हणून वीज पथकाने तहसील कार्यालयातील वीजपुरवठा खंडित केला. या घटनेनंतर तहसीलदारांनी देखील वीज वितरण कार्यालयात जाऊन विविध थकबाकी असलेल्या कार्यालयाला सील केल्याची घटना घडली. हा सारा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.