तहसिल कार्यालयासमोरुन लांबवली मोटारसायकल

0

चाळीसगाव – शहरातील तहसिलदार कार्यालयासमोरुन २९ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११.३० ते ११.४५ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने बजाज प्लॅटीना मोटारसायकल चोरुन नेली असुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील जयबाबाजी चौकातील दिलीप बिसन राणा (४६) हे त्यांच्या मित्रासोबत चाळीसगाव तहसिलदार कार्यालयात दिनांक २९/८/२०१८ रोजी खाजगी कामासाठी आले होते त्यांनी त्यांची २५ हजार रुपये किमतीची बजाज प्लॅटीना एम एच १९ बी एल ३९८९ ही मोटारसायकल चाळीसगाव तहसिलदार कार्यालयासमोर महाविर झेरॉक्स समोर सकाळी ११-३० वाजता लावुन तहसिल कार्यालयात गेले व काम आटोपुन ११-४५ वाजता परत आले त्यादरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरुन नेली होती याप्रकरणी त्यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरुन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास हवालदार धर्मराज पाटील करीत आहेत.

Copy