तळोद्यात सर्व खाजगी आस्थापने बंद

0

तळोदा : शहरात कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणुन सदर विषाणुची लागण एका संक्रमीत रुग्णाकडून अन्य व्यक्तिस होण्याची शक्यता विचारात घेत तळोदा शहरातील वैद्यकीय सुविधा आणि मेडिकल स्टोअर्स तसेच शासकिय धान्य गोडावून वगळता सर्व आस्थापने दुकाने दिनाक २२ एप्रिल ते २४ एप्रिल पावेतो बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यानी दिले आहेत.

तळोदा शहरातील व शहरालगतच्या पाच किलोमीटर च्या अंतरामधील सर्व पेट्रोल पंप ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयातील कार्यरत १० टक्के कर्मचारी यांना कार्यालयातील कामकाजासाठी मुभा देण्यात आली आहे.

आदेश संपूर्ण तळोदा शहर सीमा भागाच्या सिमा क्षेत्राकरिता लागू राहील.तळोदा शहरातील नागरीकांनी घरा बाहेर पडू नये सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्तिने उल्लंघन केल्यास त्याचा विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल असे आदेश देण्यात आले आहेत.

Copy