तळोद्यात विजेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

0

तळोदा: पाणी भरून झाल्यावर इलेक्ट्रिक मोटार बंद करत असताना विजेचा शॉक लागून 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना तळोदा येथील डी.बी. हट्टीत घडली.
सविस्तर असे, गुरुवारी सायंकाळच्या सुमारास सुनील फकऱ्या पाडवी (वय 19) हा घराचे पाणी भरून झाल्यानंतर ओट्यावरील पाण्याची इलेक्ट्रिक मोटार बंद करण्यासाठी मोटारची वायर काढत असताना त्यास डाव्या हातास विजेचा शॉक लागल्याने तो जमिनीवर पडला. त्याच्या आई-वडीलांनी त्यास तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरानी त्याची तपासणी करून तो मयत झाल्याचे घोषित केले. पांडुरंग शांताराम पाडवी यांच्या खबरवरून तळोदा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पो.नी.आर.शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनसिंग पाडवी करीत आहे.

Copy