तळोदा शहरात उद्याही सर्व आस्थापने, दुकाने राहणार बंद

0

तळोदा । शहरात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा एक भाग म्हणून विषाणुची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तिस होण्याची शक्यता विचारात घेत तळोदा शहरातील वैद्यकीय सुविधा आणि मेडिकल स्टोअर्स तसेच शासकिय धान्य गोडावून वगळता सर्व आस्थापने दुकाने 22 ते 24 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश प्रांताधिकार्‍यांनी दिले आहेत.

तळोदा शहरातील व शहरालगतच्या पाच किलोमीटरच्या अंतरामधील सर्व पेट्रोल पंपही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयातील कार्यरत 10 टक्के कर्मचारी यांना कार्यालयातील कामकाजासाठी सवलत देण्यात आली आहे. आदेश संपूर्ण तळोदा शहर सीमा भागाच्या सीमा क्षेत्राकरिता लागू राहील. शहरातील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. आदेशाचे कोणत्याही व्यक्तिने उल्लंघन केल्यास त्याच्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत.

Copy