Private Advt

तळेगाव शिवारातून बैलांची चोरी : शेतकर्‍यावर संकट

चाळीसगाव : तालुक्यातील तळेगाव शेत शिवारातून दोन शेतकर्‍यांचे 3 बैल अज्ञात इसमाने लांबविले. या प्रकरणी पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पशूधनाची वाढली चोरी
तालुक्यातील तळेगाव येथील वसंत पांडुरंग पाटील (61) व साक्षीदार धारासिंग गुलाब चव्हाण यांच्या तळेगाव शेत शिवारात बांधलेले 3 तीन बैल अज्ञात इसमाने चोरून नेल्याची घटना रविवार, 14 नोव्हेंबर रोजी रात्री 1 ते 5 वाजेदरम्यान उघडकीला आली. या घटनेने परीसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान वसंत पांडुरंग पाटील यांनी बैलांची परिसरात शोधाशोध केली असता आजपावेतो मिळून आले नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानक गाठून फिर्याद दाखल केली. यानुसार भादंवि कलम 379 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक नितीन अमोदकर करीत आहेत.