तळेगाव परिसरात अवैध दारूची तस्करी

0

सरपंचासह पोलीस पाटील यांनी एकाला पकडले

जामनेर। तालुक्यातील तळेगाव येथून हातभट्टीच्या दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत आहे. तळेगाव परिसरातील सावरला, आमखेडा, कासली तसेच टाकरखेडा, ओझरमार्गे जामनेर येथे सुद्धा तळेगाव येथुन हातभट्टीची दारू पोहचवली जात असल्याची कुणकुण सरपंच व पोलीस पाटील यांना लागली होती. त्यांच्यासोबत काही गावकरी देखील होते. त्यांनी पाळत ठेवून फुगे घेऊन जाताना मोहन गोपाळ (रा.आमखेडादेवी) एकास रंगेहात पकडले तर दोन व्यक्ती फरार झाले. पोलिसांना बोलावल्यावर पोलिसांनी दारू कुठून घेतली अशी विचारणा केली. त्यावरून पोलिसांनी दारु विक्रेता प्रकाश वंसत कोळी (तळेगांव) यांचे घर गाठले. मात्र, तो फरार झाला असून अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र गावातून मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारूची तस्करी होत असल्याने थेट जामनेर पर्यंतही हातभट्टी पोहोचत असल्याची चर्चा सध्या गावात सुरू आहे. सध्या परिसरात कोरोनामुळे लोक भयभीत आहेत. आशा लोकांना गावबंदी करून गावात प्रवेश देऊ नये, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशीही मागणी आहे.

Copy