तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे स्वच्छता अभियान

0
तळेगाव दाभाडे : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून स्वच्छता अभियान तसेच कार्यालयामध्ये राबविले. तर विविध सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्थामध्ये प्रतिमा पूजन आणि अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी वैभव आवारे, सभागृहनेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, बांधकाम समिती सभापती संदीप शेळके, नियोजन व विकास समिती सभापती अमोल शेटे, अ‍ॅड.श्रीराम कुबेर महिला बाल कल्याण समिती सभापती संध्या गणेश भेगडे, उपसभापती प्राची हेंद्रे, शोभा भेगडे, काजल गटे सह नगर परिषद कर्मचारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी स्वच्छतेबद्दलचे महत्व आपल्या मनोगत मधून व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे परिसरातील नगरपरिषदेच्या शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालये यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजन करून शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि विद्यार्थी यांनी शाळा व परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी प्रशासन अधिकारी संपत गावडे, कार्यालय प्रमुख बाळासाहेब जडर, संतोष काळे, मुख्याध्यपिका सुरेखा जाधव, बेबी जाधव, शोभा कांबळे, सुनील जगताप, किसन केंगले, केशव चिमटे, संजय चांदे यांनी शाळा परिसरात स्वच्छता अभियानमध्ये सहभाग घेतला.
Copy