तळेगावात जिनींगला आग लागून कपाशी जळून खाक

0

चाळीसगाव । तालुक्यातील तळेगाव येथील यश जिनींग अ‍ॅण्ड प्रेसींग मध्ये जिनींगच्या मशनरीला अचानक आग लागून कापूस जळाल्याची घटना शुक्रवार 10 फेब्रुवारी 2017 रोजी सायंकाळी घडली असून कापूस जळून नुकसान झाले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात आग लागल्याची नोंद करण्यात आली असून या आगीत किती नुकसान झाले याचा अधिकृत आकडा मात्र समजू शकला नाही.

याबाबत प्राप्त माहीतीनुसार चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव शिवारातील गट नं. 206/2 मध्ये धमेंद्र सुवालाल जैन (46, रा. तळेगाव ता. चाळीसगाव) यांच्या मालकीची यश जिनींग अ‍ॅण्ड प्रेसींग कपाशीची जीन आहे. या जिनींगच्या मशिनरी मध्ये 10 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:15 वाजेपुर्वी अचानक जाळ निघून आर.ओ. मॅजेशियन द्वारे रूई (कपाशी) मध्ये अचानक आग लागल्याने या आगीत कपाशी जळून नुकसान झाले आहे. या आगीत किती रूपयाचे नुकसान झाले याचा अधिकृत आकडा मात्र समजू शकला नाही. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला 1/2017 प्रमाणे अकस्मात आगीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पो.उ.नि. योगेश शिंदे करीत आहेत.