Private Advt

तलवारीने केक कापणे भोवले : दोघा तरुणांना अटक

यावल : तलवारीने केक कापल्याचा व्हिडिओ व्हायरल होवून यावल पोलिसांपर्यंत पोहोचताच पोलिसांनी संशयीताचा शोध घेत त्यांना बेड्या ठोकल्या. अटकेतील दोन्ही संशयीत कोळन्हावी, ता.यावल गावातील रहिवासी आहेत. बुधवारी पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मोबाईलवर तलवारीने केक कापतांनाचा व्हायरल व्हिडीओ आल्यानंतर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, सहाय्यक फौजदार अजीज शेख, हवलदार संजय तायडे, भुषण चव्हाण यांना व्हायरल व्हिडीओतील तरुणांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. पोलिसांच्या तपासात निलेश रमेश सोळुंके (23) व समाधान धनराज तायडे (24, कोळन्हावी) असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी दोघांना तलवारीसह ताब्यात घेतले. भूषण चव्हाण यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात ऑर्म अक्ट सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र खैरणार, हवालदार संजय तायडे करीत आहेत.