Private Advt

तलवारीच्या धाकावर दहशत : दोघे जाळ्यात

मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई : डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर भागातून दोन संशयीतांना तलवारीसह पकडले

मुक्ताईनगर : शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात हातात तलवारी घेवून दहशत निर्माण करणार्‍या दोघांना मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एक संशयेीत अल्पवयीन आहे.

दोघांविरोधात गुन्हा
मुक्ताईनगर शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरात बुधवार, 9 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी नाना जनार्दन बोदडे (31, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर, मुक्ताईनगर) व 16 वर्षीय अल्पवयीन संशयीत हे हातात तलवार बाळगून लोकांमध्ये दहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. दोन हजार रुपये किंमतीच्या दोन तलवार जप्त करण्यात आल्या असून संशयीतांविरोधात पोलिस नाईक आसीम नाजीमखा तडवी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.