…तर लक्षात ठेवा मुख्यमंत्र्यांच्या भावाचे नाव राज ठाकरे आहे

0

मुंबई: मुंबईतील वांद्रे स्थानकाजवळ मंगळवारी घडलेल्या प्रकारानंतर राजकीय आरोप- प्रत्यारोप देखील सुरु झाले आहेत. यात काहींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सोशल मीडियावरुन केली होती. यावरुन मनसे उद्धव ठाकरेंच्या समर्थनांसाठी मैदानात उतरली आहे.
मनसेच्या नेत्या रुपाली पाटील यांनी ट्विट करुन उद्धव ठाकरेंवर टीका करणार्‍यांना थेट इशारा दिला आहे. रुपाली पाटील म्हणाल्या की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगले काम करत आहेत. पण जर महाराष्ट्राच काही वेडवाकड (नुकसान) करण्याचा प्रयत्न केला तर, मुख्यमंत्र्यांच्या भावाचं नाव राज ठाकरे आहे हे लक्षात ठेवा असं रुपाली पाटील यांनी सांगतिले. तसेच राज ठाकरे विनंती करत नाही तर थेट जाळ काढतात असा इशारा देखील रुपाली पाटील यांनी दिला आहे. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संकटाच्या काळात राजकारण करु नका असे आवाहन देखील केले होते.

Copy