..तर मंत्र्यांना गावबंदी करण्याचा इशारा

0

मुक्ताईनगर । राज्यात वाढत्या शेेतकरी आत्महत्या लक्षात घेता पीआरपीतर्फे परिवर्तन चौकात रास्तारोको आंदोलन करण्यात आले व शेतकर्‍यांना कर्ज माफी देण्यात येवून 7/12 कोरा करा अन्यथा मंत्र्यांना गावबंदी करण्याचा इशारा पीआरपीतर्फे देण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील मेहुण चांगदेव येथील शेतकर्‍यांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून शासनाने येथील समस्या लवकरात लवकर सोडविण्याची मागणीदेखील यावेळी करण्यात आली.

आंदोलनात यांचा होता सहभाग
या आंदोलनात पीआरपी जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे, तालुकाध्यक्ष संजय इंगळे, अतुल बोदडे, प्रदिप इंगळे, आरिफ शेख, गोपी साळी, शगिर शाह, संतोष मेश्राम यांसह तालुक्यातील पीआरपीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. याप्रसंगी जगन सोनवणे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले व मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.